Bhet Tujhi Majhi Smarate Lyrics In Marathi - Mangesh Padgaonkar

Bhet Tujhi Majhi Smarate lyrics in Marathi. Bhet Tujhi Majhi Smarate song is sung by the Arun Date, lyrics by Mangesh Padgaonkar and, music is given by Yeshwant Deo.

Song Credit
Song Title : Bhet Tujhi Majhi Smarate
Lyrics : Mangesh Padgaonkar
Singer : Arun Date
Music : Yeshwant Deo

Bhet Tujhi Majhi Smarate Lyrics In Marathi


Bhet Tujhi Majhi Smarate Lyrics In Marathi

भेट तुझी माझी स्मरते
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची,
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते..

भेट तुझी माझी स्मरते
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची,
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते..

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा,
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा

तुला मुळी नव्हती बाधा,
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची,
भेट तुझी माझी स्मरते..

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती,
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती,

तुला मुळी जाणिव नव्हती
तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची,
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते..

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली,
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली

किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा,
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची,
भेट तुझी माझी स्मरते..

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास,
स्वप्‍नातच स्वप्‍न दिसावे तसे सर्व भास

सुखालाहि भोवळ आली
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची,
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते..

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची,
भेट तुझी माझी स्मरते.

We hope you like Bhet Tujhi Majhi Smarate lyrics Marathi. If you have any suggestions about Bhet Tujhi Majhi Smarate Lyrics, you can contact us. Don't forget to share these beautiful Bhet Tujhi Majhi Smarate lyrics in the voice of Arun Date with your friends.

Previous Post Next Post