Zenda Amucha Priya Deshacha Lyrics In Marathi | झेंडा आमुचा प्रिया देशाचा

झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम,

लढले गांधी याच्याकरिता
टिळक, नेहरू लढली जनता
समरधूरंधर वीर खरोखर
अर्पुनि गेले प्राण

करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
भारतमाता आमुची माता
आम्ही गातो या जयगीता,

हिमालयाच्या उंच शिरावर
फडकत राही निशाण
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम

या देशाची पवित्र माती
जूळती आमुच्या मधली नाती
एक नाद गर्जतो भारता
तुझा आम्हा अभिमान,

करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
गगनावरी आणि सागरतिरि
सळसळ करिती लाटा लहरी

जय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगान,

करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम.

Zenda Amucha Priya Deshacha Lyrics In Marathi | झेंडा आमुचा प्रिया देशाचा

We hope you like Zenda Amucha Priya Deshacha lyrics in Marathi. If you have any suggestions about Zenda Amucha Priya Deshacha Lyrics, you can contact us. Don't forget to share these beautiful Zenda Amucha Priya Deshacha lyrics with your friends and family.

Previous Post Next Post